पुणे : गेले ४० वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे दौंड लोकल ट्रेनला अखेर मुहूर्त मिळाला. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पुणे-दौंड या डेमू ट्रेनचा शुभारंभ केला. ही लोकल शनिवारी चारच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये दाखल होताच दौंड करानी मोठ्या उत्साहात लोकलचे स्वागत केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली ४० वर्षांची रेल्वे प्रवाशांची लोकलची मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांत मोठा आनंद पहावयास मिळाला. दौंड रेल्वे स्टेशनला लोकलच्या स्वागतासाठी प्लॅटफोर्मवर रांगोळी काढण्यात आली होती.. स्वागत कमानी पोस्टर्स उभारले होते. सुवासिनींनी लोकलची विधीवत पुजा केली. अशी मोठी जय्यत तयारी यावेळी करण्यात आली होती.


दरम्यान पुढील काळात या लोकलचा मार्ग बारामती पर्यंत देखील वाढविण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये देखील अत्यंत उत्साहात या लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्का टिळक उपस्थित होते.