पुणे : पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस नेत्यांची आज मुंबईत बैठक होत आहे. त्यात आघाडी बाबत काँग्रेस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, आज संध्याकाळ पर्यंत आघाडीचा निर्णय जाहीर होईल किंवा आमच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कोणी किती जागा लढवायच्या हा तिढा सुटल्यात जमा आहे. मात्र, काही मोजक्या प्रभागातील जागांवरून वाद आहे. 
काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी पणाला लागलेले प्रभाग कोणते आहेत आणि हा वाद काय आहे पाहूयात 


- डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनी प्रभागात काँग्रेसचे विद्यमान उपमहापौर मुकारी अलगुडे आणि राष्ट्वादीचे विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके आमने सामने आहेत. कोणाला जागा सोडायची हा वाद आहे. 


- पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले खुल्या प्रवर्गातून लढणार आहेत. तर, काँग्रेस विद्यमान नगरसेवक दत्ता बहिरट यांच्यासाठी आग्रही आहे. 


- महापौर प्रशांत जगताप यांना त्यांच्या वानवडी प्रभागात तीन जागा हव्या आहेत. तर, काँग्रेस दोन जागांसाठी आग्रही आहे. माजी मंत्री बाळासारब शिवरकर यांचा मुलगा आणि पत्नी इथून काँग्रेसकडून इच्छुक आहेत. 


-  सहकार नगर प्रभागात काँग्रेसला दोन जागा हव्या आहेत. तिथे काँग्रेसचे आबा बागुल विद्यमान नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी तीन जागांसाठी आग्रही आहे. राष्ट्रवादीचे इथे चार विद्यमान नगरसेवक आहेत. 


राष्ट्रवादीने काँग्रेसला ६० जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळं , जागा कमी आणि त्यातही आमच्या उमेदवारांवर आक्रमण. अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. असा आरोप काँग्रेस कडून करण्यात येतोय.