पुणे : पुण्यात बालेवाडीतील फाईव्ह स्टार ऑरकिड हॉटेलवर महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने छापा टाकला आणि हे हॉटेल सील केलं. या हॉटेलचा बारा कोटी रुपये प्रॉपर्टी टॅक्स थकल्यामूळ ही कारवाई केली. या ऑरकिड हॉटेलचे मालक विठ्ठल कामत आहेत. गेले पाच वर्ष या हॉटेलचा प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी बँड पथक घेऊन त्या ठिकाणी गेले आणि हॉटेलला सील केलं. हॉटेलच्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या हॉटेलला पूर्वी नोटीसदेखील पाठवण्यात आली होती. मात्र, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यानं कारवाई करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रॉपर्टीज आहेत. त्यांचा कोट्यवधी रुपये टॅक्स थकलाय. त्यामुळे आता महापालिका सर्वच ठिकाणी अशी कारवाई करणार का हे पहाणं महत्वाच ठरणार आहे.


महापालिकेच्या कारवाईवर विठ्ठल कामत यांची प्रतिक्रिया



दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे तसंच मी या हॉटेलचा मालक नाही अशी प्रतिक्रिया विठ्ठल कामत यांनी दिली आहे.