कल्याण-डोंबिवली : सत्ताधारी भाजप-शिवसेनेत वरच्या फळीत सगळं काही आलबेल दिसत असलं तरी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली धूसपूस मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेमध्ये असूनही सतत विरोधी पक्षाची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या 'सामना' या वृत्तपत्राची कल्याणमध्ये जिल्हा भाजपतर्फे होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. नेतीवली इथल्या टाटा पॉवर चौकात जमून भाजपने आपला निषेध व्यक्त केला. भाजप कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीतर तर त्यांनी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख भाऊ चौधरी यांना काळं फासलं. 


शिवसेनेचे आमदार एकीकडे केंद्रात, राज्यात भाजपबरोबर सत्तेत आहेत... मंत्रीपदही उपभोगत आहेत मात्र, तरीही शिवसेना कायम आमच्यावर विरोधी पक्षासारखी टीका करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजप न शिवसेनेच मुखपत्र असणाऱ्या सामना पेपरची होळी केली. 


इतकंच नाही तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस निरीक्षक मधु चव्हाण यांच्या पुतळ्यालाही जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध भाजप कार्यकर्त्यांनी केलाय.