अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह सर्व सभापतींविरूदध अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली विरोधकांकडून सुरू होत्या. मात्र सत्ताधा-यांनीच अविश्वास ठराव दाखल करीत विरोधकांची अडचण केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची सत्ता आहे. अध्यक्षपद न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे शामकांत भोकरे यांना हाताशी धरून अविश्वास ठराव दाखल करण्याचे प्रयत्न शिवसेनेने सुरू केले होते. 


मात्र आता सत्ताधारी सदस्यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव दाखल करीत विरोधकांना अडचणीत टाकलंय. अविश्वास ठराव पारीत करण्याइतके संख्याबळ विरोधकांकडे नाही. त्यामुळे हा ठराव बारगळला तर पुन्हा वर्षभर विरोधकांना अविश्वास ठराव दाखल करता येणार नाही.