पुणे :  शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात १ जुलैपासून पावसाची जोर वाढला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात १ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला किमान २० दिवस पुरेल एवढे साठले असल्याचं सांगण्यात येतंय.


रविवारी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे ३ तासांत खडकवसाला येथे ३ मिलिमिटर पाऊस झाला. जून महिन्यात एकूण ३६ मिलिमिटर पाऊस झाला. पानशेत ४०, वरसगाव ४६, टेमघर ५८ मिलिमिटर पाऊस पडला आहे.  पानशेत धरणाची पातळी ८ फुटाने वाढली आहे. तर वरसगाव धरणाची पातळी साडेतीन मीटरने वाढली आहे.