पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र लवकरच पाहायला मिळणार आहेत. फेसबूकवरून राज ठाकरेंची ही व्यंगचित्र पाहायला मिळतील. खुद्द राज ठाकरेंनीच याबाबतची माहिती दिली. माझ्या फेसबूक पेजवर मी काढलेली राजकीय व्यंगचित्र पाहायला मिळतील असं राज ठाकरे म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या बालगंधर्व कलादालनामध्ये चित्रकार घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषा या हास्यचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन राज ठाकरेंनी केलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी त्यांच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर दिली.


नावाजलेल्या व्यंगचित्रकारांची नावं आपण रस्त्यांना आणि चौकांना दिली पण त्यांच्याविषयी माहिती देण्यात आपण कमी पडलो असं राज ठाकरे या कार्यक्रमात म्हणाले. तसंच शाळेपासूनच विद्यार्थ्यांना व्यंगचित्राकारांविषयी माहिती मिळावी अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.