स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दुफळी
ऐन निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुफळी पुन्हा उघड आलीय.
लातूर : ऐन निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुफळी पुन्हा उघड आलीय. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाला दिलेल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीवर खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केलीय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतल्या नेत्यांनी आपल्याच मुलांना उमेदवारी देऊ नये अशी आपली ठाम भूमिका असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलंय.