नागपूर : कोपर्डीमधील एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार आणि खून झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित विद्यार्थिनी आठवीत असून तिच्या प्रियकरानंच तिच्यावर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.


पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शिकवणी वर्गातून घरी येत असताना नराधमानं तिला गाठलं. मोठ्या बहिणीनं बोलावल्याचं कारण सांगत त्यानं या मुलीला त्या भागातील टीबी वॉर्ड परिसरात नेऊन अत्याचार केले. तिच्यावर शरीरावर जखमा असल्याने आरोपीसोबत झटापट झाल्याची देखील शक्यता आहे. पीडीत मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानंतर सारा प्रकार उघड झाला. वैद्यकीय तपासणीनंतर मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.