गजानन देशमुख- झी मीडिया परभणी : कोपर्डी आणि भिलवडी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच परभणी जिल्ह्यात ही एका मतिमंद मुलीवर भावकितल्याच 55 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
कोपर्डी आणि भिलवडी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटना ताज्या असतांनाच परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सेलमोहा गावात ही 21 वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही तिच्या आजी आजोबा बरोबर राहते. तर तिचे भाऊ आणि वडील कामानिमित्त पुण्याला राहतात. तिला 14 वर्षाचा एक चुलत भाऊ आहे. तो रविवारी शाळेला सुट्टी असल्याच्या कारणाने गुरे चारण्यासाठी शेतात गेला होता.


 दुपारच्या वेळेस त्याच्या सोबत खेळण्यासाठी पीडिता ही शेताकडे एकटीच जात होती. गावतीलच 55 वर्षीय विष्णु मुंडे याने तिला रस्त्याने येतांना दुरूनच पाहिलं. रस्त्याकडेला असलेल्या शेतामधील नाल्यामध्ये तिला नेऊन तिच्यावर त्या नराधमाने अतिप्रसंग केला. 
 
 पीडितेला रस्त्यात आडवून तिच्याशी कुणी तरी काही बोलतांना आणि तिच्या हाताला धरून शेतात घेऊन जात असतांना पीडितेच्या चुलत भावाने दुरूनच बघितलं होत. त्यांच्या मनात संशय बळावल्याने तो तिच्याकडे धावत आला. हा सगळा प्रकार घडत असतांना त्याने या नराधमाला हे कृत्य करण्यास मज्जाव केला असता त्या विकृत नरधमाने पीडितेच्या भावाच्या दिशेने दगड फेकून मारला.



 विकृत वृतीच्या विष्णू मुंडेला पीडितेच्या वयाचे नातू आहेत. विशेष म्हणजे तो पीडितेच्या भावकितलाच आहे. सदर अत्याचार प्रकरणी पिंपळदरी पोलिस ठाण्यात नराधम विष्णु मुंडे विरोधात 376 प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडितेच्या भावाने सदर केस फास्टट्रक कोर्टात चालवून आरोपीला फाशीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केलीय.