पुणे : एका अल्पवयीन विद्यार्थीनीचे दिवसा ढवळ्या अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हडपसर येथे बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. आरोपींना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे,


हडपसरमधील चेतन सोमनाथ शिरोले आणि  मिलिंद शिवानंद बनसोडे अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींचं वय २१ वर्षे आहे.


पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के.एस. शिंदे करत आहेत.


आरोपी हे मजुरीचे काम करतात. दिनांक १४ जुलैला आरोपींनी पीडितेला ती कॉलेजमधून परतत असताना दुचाकीने धडक दिली. नंतर त्यांनी जबरीने तिला गाडीवर बसवले आणि तिला गुंगीचे औषध दिले. नंतर सासवड रोडवरील परिसरात आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला.