प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : आपल्या घरात आपण शोभिवंत मासे तर पाळतो...पण त्या माशांसाठीचं जे खाद्य आहे ते कुठून येतं हे तुम्हाला माहित आहे? नाही ना... हे सर्व खाणं येतं ते जपान आणि चीन या देशातून....पण आता ते आपल्या देशातही तयार होणं शक्य आहे... आणि हे शक्य रत्नागिरीतल्या चिमुरड्यांमुळे...पाहूयात कसं ते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीतल्या नाईक हायस्कूलमध्ये सहावीत शिकणा-या या विद्यार्थ्यांनी अनोखा प्रयोग केलाय. शोभिवंत माशांचं भारतीय बनावटीचं खाद्य या सहा मुलांनी तयार केलंय...विशेष म्हणजे या माशांचं खाद्य जपान, चीनमध्येच तयार होत असे...पण या चिमुरड्यांनी आयडियाची कल्पना लढवून भारतीय बनावटीचं शोभिवंत माशांसाठीचं पहिलं खाद्य तयार केलंय. भाताचा कोंडा, गव्हाचे पीठ, सोयाबीन पावडर, माशाची कुटी अशा सहज मिळणाऱ्या गोष्टी वापरून हे खाद्य तयार करण्यात आलंय. 


 



बाजारभावानुसार एक किलो माशांचं खाद्य खरेदी केल्यास त्याची किंमत 1805 रुपये होते. तेच या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं खाद्य केवळ पाचशे रुपयात एक किलो मिळतं, आणि ते जपान, चीनच्या खाद्यापेक्षा कित्येक पटीनं सरस... 2016 मध्ये नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसच्या स्पर्धेत सातशे स्पर्धकांमधून टॉप 15 मध्ये या प्रोजेक्टची निवड करण्यात आलीय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हा केवळ एकमेव प्रोजेक्ट या स्पर्धेतून निवडण्यात आला होता...


विद्यार्थ्यांचं हे संशोधन थक्क करणारं असल्याची प्रतिक्रिया मत्स्य विभागातले तज्ज्ञ सांगतात... 


माशांच्या भारतीय बनावटीच्या खाद्यानं नवी क्रांती होऊ शकते...नवी इंडस्ट्री देखील उभी राहू शकते... त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे...