नागपूर : होळीची तयारी सुरु झाली आहे. वैशाख वणव्याला तसा अजून अवकाश आहे. मात्र मार्च महिन्याच्या मध्यावरतीच विदर्भातला पारा 40च्या घरात गेला आहे. त्यामुळे यंदा तापमानाचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात या महिन्यात तापमानाची नोंद नेहमीपेक्षा 2 ते 3 अंश जास्त आहे. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांची चाहूल लागाली आहे. नागपूरच्या वाढत्या पाऱ्याचा भल्या-भल्यांनी धसका घेतला आहे. कारण देशात सर्वोच्च तापमानाची नोंद याच शहरात झाली आहे.


उन्हाळा सुरु होण्याच्या आधीच त्याची चाहूल फेब्रुवारी महिन्यात जाणवायला लागली. मार्च महिन्यात तर पाऱ्याने सामन्यापेक्षा २-३ अंशावर झेप घेतली. ही तर सुरूवात आहे. पुढचे दोन महिने कसे जायचे असा प्रश्न आता नागपूरकरांना पडलाय.


छत्तीसगड राज्यातील हवामानाची परिस्थिती बदलल्याने या काळात नागपूर आणि सभोवताली अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे.