चंद्रपूर : तापमानाचे यंदाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत चंद्रपूरमध्ये 45.2 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीय. तर वर्ध्यात पारा 45 अंशांवर पोहचलाय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलढाणा वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 43 अंश से.च्यावर होतं. विदर्भातल्या नागरिकांना आणखी काही दिवस सूर्यनारायणाचा तडाखा सहन करावा लागेल. 


एप्रिल महिना केवळ मध्यावर असताना या वर्षी पारा मागील सर्व रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.. पुढील पाच दिवस तापमानात प्रचंड वाढ होणार असून तापमानाचा पारा 45 ते 46 अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता वेध शाळेने वर्तवलीय.