मुंबई: पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं हिमायत बेगला दिलासा दिला आहे. पुणे सत्र न्यायालयानं हिमायत बेगला फाशीची शिक्षा सुनावली होती, पण याविरोधात हिमायत बेगनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर उच्च न्यायालयानं हा निकाल दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणजे या बॉम्बस्फोटाचा पाठपुरावा करणाऱ्या एटीएसला मोठा धक्का मानला जात आहे. 13 फेब्रुवारी 2010 ला झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पुणे हादरलं होतं. 


या स्फोटामध्ये 17 जण ठार तर 58 जण जखमी झाले होते. या प्रकरणी हिमायत बेगला सप्टेंबर 2010 मध्ये अटक करण्यात आली होती. हिमायत बेग हा इंडियन मुजाहिद्दीनचा सदस्य असल्याचा दावा करण्यात आला होता.