टी.वाय.बी.कॉम आणि बी.एस.सीच्या निकालाची तारीख जाहीर
मुंबई विद्यापीठातर्फे टी.वाय.बी.कॉमचा निकाल हा शुक्रवारी जाहीर होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. आता टी.वाय.बी.कॉमचा निकाल २४ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठातर्फे टी.वाय.बी.कॉमचा निकाल हा शुक्रवारी जाहीर होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. आता टी.वाय.बी.कॉमचा निकाल २४ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यापीठ प्रशासनाने १ जूनला टी.वाय.बी.कॉमच्या निकालाची तारीख जाहीर केली होती. यावेळी ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचा आनंदोत्सवही विद्यापीठाने साजरा केला होता.
मुंबई विद्यापीठाने त्यानुसार टी.वाय.बी.कॉमचा निकाल १० तर टी.वाय.बी.एचा निकाल २० जूनला जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. पण, शुक्रवारी निकालाच्या दिवशीच निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
टी.वाय. बी.एस.सी
मुंबई विद्यापीठाने टी.वाय.बी.एस.सीचा निकाल आज म्हणजेच ११ जूनला जाहीर करण्याची घोषणा केली आहे.