पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, निवृत्त पोलिसांना घर देण्याचे प्रयत्न
राज्यातल्या पोलीस कर्मचा-यांसाठी सरकारतर्फे घरं बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.
नागपूर : राज्यातल्या पोलीस कर्मचा-यांसाठी सरकारतर्फे घरं बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. मुंबईत घाटकोपर भागात पोलीस कर्मचा-यांसाठी मोठ्या टाऊनशीपचं बांधकाम होत आहे.
राज्यातील पोलीस कर्मचा-यांसाठी बांधल्या जाणा-या घरकुलासोबत अन्य सोयीही दिल्या जाणार आहे. दुसरीकडे निवृत्त पोलीस कर्मचा-यांसाठी मालकी हक्काचे पट्टे देण्यासंबंधी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे.