उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने शोभा राऊतला २  वेगळ्या प्रकरणात ८  वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन महसूल अधिकारी शोभा राऊतला २०१४ च्या लाचखोरी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोभा राऊतने शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूरसाठी झाडे आणि शेतजमिनीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी लाच मागितली होती.  शोभा राऊतला या प्रकरणी २०१४  मध्ये ३९ हजार ४०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ हात अटक करण्यात आली होती.


कोर्टात सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून शोभा राऊतला दिले होते, हा मुद्दा गंभीर ठरला आहे. 


महसूल अधिकारी शोभा राऊतला दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी ४ वर्षे, अशी एकूण ८ वर्षांची शिक्षा उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने  सुनावली आहे. राऊतला ४ वर्षाचा सश्रम कारावास आणि दोन्ही कलमांखाली मिळून ५० हजार दंड ठोठावण्यात आला आहे, मात्र एकाच वेळी दोन्ही शिक्षा शोभा राऊतला भोगायच्या आहेत.