पुणे : कोंढवा येथे ऑटो रिक्षा घरावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीफ इब्राहीम खान त्यांची पत्नी फैमिदा शरीफ खान आणि बहिण झहिरा जहीर कुरेशी यांचा या अपघातात मृत्यू झाला. तर मोमीन बाबूलाल शेख हा रिक्षाचा चालक गंभीर जखमी झालाय. 


खान कुटुंबीय कोंढव्यातील गल्ली नं. ३ मध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घरी निघाले असताना हा अपघात झाला. कोंढवा येथील महादेव बाबर यांच्या बंगल्याजवळील उतारावर अतुल चौगुले यांचे घर आहे. या घरावर ऑटो रिक्षा जाऊन आदळली. 


यामध्ये खान पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले तर त्यांची बहिण झहिरा ससून रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्युमुखी पडल्या. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.