नागपुरात तब्बल सोळा लाख रुपयांचे मोबाईल लंपास
चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एका रात्रीतून चोरट्यांनी विविध दुकानांमधून तब्बल सोळा लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत.
नागपूर : चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एका रात्रीतून चोरट्यांनी विविध दुकानांमधून तब्बल सोळा लाख रुपयांचे मोबाईल लंपास केले आहेत.
शहराच्या सीमेतील चार दुकानं आणि सावनेर तालुक्यातील एका दुकानामध्ये चोरट्यांनी हात साफ केलाय. मात्र चोरट्यांचा हा चोरचा प्रताप एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. हे चार जण चोर होते. सर्वजण कारमधून आले होते.
सावनेरमध्ये दुकानाचे शटर तोडल्यावर दुकानातील अलार्म वाजू लागला. अलार्मचा आवाज ऐकताच चोरट्यांनी धूम ठोकली. इथं चोरी करुन हे चोरटे पुढे मध्य प्रदेशात पळून गेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पोलिसांनी या सगळ्या चोरीप्रकरणी गुन्ह्याची नोंद केलीय.