कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई अपघातात जखमी
कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुनबाईं अपघातात जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच गीतांजली सुनील खोत या देखील जखमी झाल्या आहेत.
सांगली : कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई अपघातात जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच गीतांजली सुनील खोत या देखील जखमी झाल्या आहेत.
इस्लामपूरच्या प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचारा मोहिनी खोत यांना दाखल करण्यात आले आहे. सांगलीतील आष्टा इस्लामपुर रोडवर हा अपघात झाला आहे.
निवडणूक प्रचारासाठी जात असताना हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहेत. गाडीचे टायर फुटल्याने तवेरा गाडी झाली पलटली. गाडीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी आणि गीतांजली आणि काही महिला कार्यकर्ते होते.