कल्याण : ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला विरोध सुरुच आहे. कल्याण आणि बोरिवलीमध्ये ए दिल है मुश्कील या सिनेमाला कडाडून विरोध करण्यात आला. कल्याणमध्ये या सिनेमाविरोधात संभाजी ब्रिगेडनं जोरदार आंदोलन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एसएम-5 मल्टिप्लेक्सच्या बुकिंग ऑफिसची तोडफोड केलीय.. तर बोरिवली इथे मॅक्सेस सिनेमा थिएटरमध्ये संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलं. सिनेमागृहातलं पोस्टर यावेळी फाडून जाळण्यात आलं. पाकिस्तानी कलाकारांना यापुढे कोणत्याही सिनेमात काम देण्यात येऊ नये अशा घोषणा देण्यात आल्या. 


दरम्यान पूर्वीपासून इशारे देण्यात येऊनही आणि पोलिसांचा पहारा असूनही मल्टिप्लेक्स वर हा हल्ला झल्यान पोलिसांच्या कार्यक्षमते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


इतकंच नव्हे तर तोडफोड करणार्यांनी काही पत्रकारांना सुद्धा आधी पासूनच फोन वरून कल्पना दिली असताना सुद्धा पोलिसांना याचा सुगावा लागू नये या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.