तहसिलदाराच्या चालकाची हत्या
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग धरून तहसिलदाराच्या चालकाला ठार केल्याची घटना इंदापूरमध्ये घडलीये.
इंदापूर: अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग धरून तहसिलदाराच्या चालकाला ठार केल्याची घटना इंदापूरमध्ये घडलीये. अनिल काळे असं या चालकाचं नाव आहे.
वाऴूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारणारे तहसिलदार सुर्यकांत येवले यांना इशारा म्हणून ही हत्या केल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी वाळू व्यावसाईक सचिन माने आणि नवनाथ एकाड यांच्याकडे संशयाची सुई आहे.
काळे आपल्या बाईकवरून बायपास इथून जात होते. त्यावेळी त्यांना तवेरा गाडीनं धडक दिलीआणि गाडी त्यांच्या अंगावर घालण्यात आली. आरोपी शिवाजी एकाड हा नवनाथ यांचा भाऊ आहे. त्याच्यासह 3 आरोपींना अटक करण्यात आलीये.
गेल्या काही दिवसांपासून महसूल विभाग आणि वाळू व्यावसायिकांमध्ये वाद सुरू आहे. यातूनच ही हत्या झाल्याचं बोललं जातंय. ऑगस्ट 2015मध्येही येवले यांच्या गाडीला वाळू माफियांच्या ट्रकनं उडवलं होतं. त्यातून ते थोडक्यात बचावले होते.