सातारा : संतोष पोळची कालपासून सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी कसून चौकशी केली. यानंतर नातेवाईक डॉक्टर मित्रांची चौकशी केली. तर सहा जाणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


आर्थिक व्यवहाराबरोबर अवैधरित्या किडनी विकण्याच रॅकेटही असल्य़ाचा पोलिसांचा संशय आहे. यादृष्टीने तपास करण्यासाठी 8 पथके तयार करण्यात आलेली आहे. 


दरम्यान, सातारा पोलिसांमध्ये दहशत होती, अशी कबुली विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. पोळ आपल्या महिला सहकाऱ्याच्या मदतीने स्वत: मारहाण करून घेत असे. तसेच उपोषणाला बसून पोलिसांवर दबाव निर्माण करत असे. वारंवार एसीबीचा धाक दाखवत असल्यामुळं पोलीस अधिकारीही त्याला दचकून असायचे, अशी माहिती पाटलांनी दिली. 


डॉक्टर संतोष पोळनं भुलीचे इंजेक्शन देऊन सहाजणांचा खून केल्याची माहिती समोर आलीय. या हत्याकांडामागं आर्थिक लाभ हे मुख्य कारण असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत असल्यानं वाईकरही सुन्न झालेत.