गडचिरोली : कुठलीही पूर्वसूचना न देता गडचिरोलीतल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातून, मुलामुलींना हाकलून लावल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोलीच्या शासकीय आदिवासी वसतिगृहात नव्या प्रवेशितांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. या एकमेव कारणासाठी वसतिगृह अधीक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचा आदेश जारी केला. या विद्यार्थ्यांचं भोजनालय बंद करण्यात आलं. 


अधीक्षकांनी मुला-मुलींच्या कक्षातील सामान फेकत शिवीगाळ केली. त्यांची लायकी काढली. या प्रकारामुळे भांबावलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडे दाद मागितली. मात्र तिथेही त्यांना घरी जा असा सल्ला दिला गेल्यानं, विद्यार्थी आणि आदिवासी संघटना संतप्त झाल्या आहेत. 


दरम्यान या विद्यार्थ्यांनी स्थानिक आमदार डॉक्टर देवराव होळी यांची भेट घेतली. सोमवारी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करु असं आश्वासन, आमदार देवराव होळी यांनी या विद्यार्थ्यांना दिलं.