मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यामुळे 16 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारपासून स्कूल बस रद्द करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशननं घेतला आहे. डिझेल भरायला पैसे नसल्याचं सांगत असोशीएशननं पालकांना वेठीला धरलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळा पैसा धारकांना दणका देण्यासाठी मोदी सरकारनं 500 आणि हजाराच्या नोटा चलानातून बाद केल्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रत्येकाला थोडा त्रास होतोय खरा मात्र सरकारच्या या निर्णयाचं जनतेनं स्वागतच केलं आहे.


30 डिसेंबर ही नोटा बदलण्याची अखेरची मुदत असल्यामुळे सर्वसामान्य जनता बँकांमध्ये गर्दी करत आहे. अशात प्रत्येकजण रोजच्या व्यवहारात तडजोड करु पहात आहे. असं असताना सर्वसामान्यांना दिलासा देण्या ऐवजी स्कूल बस असोसिएशननं आडमुठी भूमीका घेत नाहक पालकांना वेठीस धरलं आहे.