पुणे : ज्येष्ठ समीक्षक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी १२.३०च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
त्यांनी स्टेट ट्रान्स्पोर्ट, महाराष्ट्र राज्य परिवहनमध्ये १० वर्षे नोकरी केल्यानंतर ते १० वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. ३७ काव्यसंग्रहांचे परीक्षण करणारे जाधव तसेच १८५० ते २००० काळातील मराठी नवकवितांवरील प्रयोग यावर परिसंवादातही सहभागी होते. त्यांनी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी २० वर्षे जबाबदारी सांभाळली.


औरंगाबाद येथील २००४मधील ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही जाधव यांनी भूषवले असून ते मराठी साहित्य परिषदेचेही अध्यक्ष होते. राज्य शासनातर्फे देण्यात येणारा २०१५ वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय.


  जाधव यांची साहित्य संपदा


- आनंदाचा डोह
- काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
- खेळीमेळी (ललित)
- नववाङ्‌मयीन प्रवृती व प्रमेये
- निवडक समीक्षा
- निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी
- पंचवटी
- प्र. के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
- माझे चिंतन
- वागर्थ
- वाङ्‌मयीन निबंध लेखन
- वाङ्‌मयीन परीप्रेक्ष्य
- वासंतिक पर्व (ललित) 
- विचारशिल्प
- संध्यासमयीच्या गुजगोष्टी 
- समीक्षेतील अवतरणे
- साठोत्तरी मराठी कविता व कवी
- साहित्य व सामाजिक संदर्भ
- साहित्याचे परिस्थिती विज्ञान