बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्कारप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. यातले तीन आरोपी फरार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आश्रम शाळेतल्या चौथीतल्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच बलात्कार केल्याची घटना घडली होती. अशा सुमारे बारा विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आला असून सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच याप्रकरणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.