पुणे : पुण्यातील कुख्यात कल्याणी देशपांडेला पुणे पोलीसांनी अखेर अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवण्याच्या गुन्ह्यांमध्ये ती फरार होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाषाण भागातून कल्याणी देशपांडेला गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. कल्याणी देशपांडेवर पिटा कायद्यांतर्गत शहरात वेगवेगळ्या ठाण्यांमध्ये 20 गुन्हे दाखल आहेत.  


याचबरोबर हत्येचे दोन गुन्हेदेखील तिच्यावर दाखल आहेत. परंतू हे सगळे खटले प्रलंबित आहेत. एकाही खटल्याचा निकाल आजपर्यंत लागलेला नाही.