...त्या शहिदाच्या आई-पत्नीला अजूनही कल्पना नाही
हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याच्या गांजपूर इथल्या विकास समुद्रे यांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर या गावावर शोककळा पसरली.
बीड : हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याच्या गांजपूर इथल्या विकास समुद्रे यांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर या गावावर शोककळा पसरली.
या घटनेची विकासच्या आई आणि पत्नीला अद्याप कल्पना देण्यात आलेली नाही. मात्र गावकऱ्यांना माहिती मिळाल्यापासून गावातील एकही घरात चूल पेटलेली नाही.
गावाला पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदार यांनी भेट दिली असून सोमवारी किंवा मंगळवारी विकास समुद्रे यांचे पार्थिव गावाकडे येईल, असं सांगण्यात आलंय.
विकास यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि नऊ महिन्याची मुलगी असा परिवार आहे. विकास यांच्या आठवणी सांगताना गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांचा भाऊ शोकमग्न अवस्थेत बसून होता. यावेळी गावकरी तसंच विकास यांच्या मित्रांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या.