कोल्हापूर : कोल्हापूर संस्थानातल्या जनतेची तहान भागावी या उद्देशानं छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात देशातलं पहिलं धरण बांधलं. याच राधानगरी धरणावर देखरेख रहावी यासाठी बेनजर व्हिलाची शाहू महाराजांनी उभारणी केली. ते स्वत: या कामाकडे लक्ष द्यायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहू महाराजांनी हा बेनजर व्हिला का बांधला, त्याच्यामागे त्यांचा काय उद्देश होता हे जाणून घेण्याबाबत खरोखरंच उत्सुकता होती. शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणी कमी झाल्यामुळे हा बेनजर व्हिला दिसून येतोय. ही ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी वाढतेय.


पाहा व्हिडिओ शेवटी


बेनजर व्हिलाची पूर्ण माहिती पुराभिलेखागारात उपलब्ध आहे. पण यावर आजपर्यंत म्हणावा तसा प्रकाश पडलेला नाही. त्यामुळं सरकारनं या वास्तूचं महत्त्व ओळखून त्याचं जतन, संवर्धन करण्याची मागणी पुढे येतेय.


दूरदृष्टी असणारा जनतेचा नेता अशी शाहू महाराजांची ओळख. पण अशा या शाहूंच्या प्रेरणारुपी अनेक वास्तूंचं म्हणावं तसं संवर्धन झालेलं नाही. किमान आता तरी सरकारनं यामध्ये लक्ष घालावं एवढीच शाहूच्या रयतेची अपेक्षा आहे.