शहीद शंकर शिंदे यांना अखेरचा निरोप
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या शंकर शिंदे यांचं पार्थिव नाशिकच्या चांदवडच्या भायळे गावात आणण्यात आलंय.
भायळे, नाशिक : उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हौतात्म्य आलेल्या शंकर शिंदे यांचं पार्थिव नाशिकच्या चांदवडच्या भायळे गावात आणण्यात आलंय.
भायळे इथं शहीद शिंदे यांना लष्कराकडून सलामी देण्यात आलीय. थोड्याच वेळात शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या वीर सुपुत्राच्या जाण्यानं संपूर्ण भायळे गावावर शोककळा पसरलीय. शहीद शंकर शिंदे यांनी सतरा वर्ष लष्कराची सेवा केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा आणि वृद्ध आई-वडिल असा परिवार आहे.