उस्मानाबाद : विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. यामुळे आता आमदारांचं मासिक वेतन दीड लाखांपर्यंत जाणार आहे, तर निवृत्त आमदारांना 50 हजार रुपये वेतन मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदारांच्या या वेतनवाढीवर सामन्यांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन केलं आहे. आमदारांना मतदार संघामध्ये फिरावं लागतं. चार-सहा महिने आमदार मुंबईमध्ये असतो, त्यामुळे खर्च होतो, असं म्हणत पवारांनी वेतनवाढ योग्य असल्याचं सांगतिलं. 


वेतनवाढीचे समर्थन करताना पवारांनी उपस्थित असलेल्या पत्रकारांनाही चिमटे काढले. न्यूज अँकरचा पगार मला माहिती आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला.