औरंगाबाद : जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सगळ्यात जास्त जागा जिंकून भाजपला सत्तेबाहेर राहावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवारी रात्री याबाबत बैठक झाली. त्यात अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे असणार आहे.  


काँग्रेसन आधीच पाठींबा दिला होता. मात्र शिवसेनेने ही ऑफर मान्य केली नव्हती. पण भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याचा बोलले जाते आहे. शिवसेना काँग्रेस हे एकत्र आल्यामुळं सगळ्यात जास्त जागा जिंकून भाजपाला सत्तेबाहेर राहावं लागणार आहे.