नाशिक : भाजपाच बहुमात असलेल्या नाशिक महापालिकेत आता पारदर्शकता काय असते ते दाखविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. आज गटनेता निवड करताना शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका महापलिकेत परखड विरोधकांची असल्याचं स्पष्ट केलं आहे.  


आज शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी विलास शिंदे यांची गटनेता निवड करत महसूल कार्यालयात नोंदणी केली. यावेळी सर्वांनी एकत्रित शक्ती प्रदर्शन करत पालिकेतील आपली भूमिका मांडली. नाशिक महापालिकेत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत.