आळंदीमध्ये शिवसेना-भाजप असा थेट सामना
भाजपकडून शिवसेनेला कडवं आव्हान
पुणे : आळंदीमध्ये शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. आळंदीमध्ये शिवसेना-भाजप असा थेट सामना आहे. गेली १० वर्ष आळंदीत शिवसेनेची सत्ता आहे. यावेळी भाजपकडून शिवसेनेला कडवं आव्हान देण्यात आलं आहे. भाजपने २ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. त्यामुळं भाजपचे पारडे जड आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून वैजयंती कांबळे, शिवसेनेकडून भाग्यश्री रंधवे, बसपकडून डॉक्टर मनिषा रंधवे आणि काँग्रेस पुरस्कृत आशा गायकवाड यांच्यासह ८ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.