सांगली : सांगलीत झालेल्या काँग्रेसच्या सभेत काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही,  ही तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, त्यामुळे आत्ता शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेणार नाही. 


जर समजा त्यांनी पाठिंबा काढून घेतलाच,  तर मात्र दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यावर ईडीचा छाप्पा पडेल, आणि हीच भीती असल्याने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेणार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे.