ठाणे : प्रतिष्ठेच्या झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी मतमोजनीच्या पहिल्या टप्प्यात मोठी आघाडी मिळवली.  पहिल्या फेरीत एकूण ५०० मतांपैकी फाटक यांना तब्बल ३११ मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार वसंत डावखरे यांना फक्त १८९ मतं मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण १०५७ मतांपैकी ६ मतं बाद ठरवण्यात आली आहेत. तर उरलेल्या 1051 पैकी 526 मतं जिंकणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत वसंत डावखरेंना सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळत असे. पण यंदा शिवसेनेनं रवींद्र फाटक यांच्या रुपानं तगडा प्रतिस्पर्धी दिला आहे. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचच लक्ष होतं. 


रवींद्र फाटक यांना ६०२ मतं मिळाली तर डावखरेंना ४४९ मतं मिळाली.


पाहा व्हिडिओ