म्हणून शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड नॉट रिचेबल!
बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
उस्मानाबाद : बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमधले वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
रवींद्र गायकवाड एअर इंडियाविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर उमरगामध्ये शिवसैनिकांसोबत रवींद्र गायकवाड गुढीपाडवा साजरा करतील असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय. दरम्यान उद्या खासदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवसेनेनं उमरगा बंदची दिली गेलीय. तर अजूनही रवींद्र गायकवाड यांचा मोबाईल स्वीच ऑफच आहे.
रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या एका अधिका-याला मारहाण केली होती. एअर इंडियाच्या कर्मचा-यांनी खासदारांना दुय्यम वागणूक दिली असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. बिजनेस क्लासचे तिकीट असूनही इकॉनामी क्लासमध्ये हलवल्यामुळे संतापलेल्या रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिका-याला चपलेने मारहाण केली होती. ते पुण्यावरून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने निघाले होते.