पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कारभाराचे धक्कदायक किस्से वेळोवेळी बाहेर आलेले आहेत. आता मात्र काही मनोरंजक गोष्टीदेखील उघड होत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या साधा बायो डेटा देखील विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे माहिती अधिकारात ही बाब समोर आलीय. विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रा. अतुल बागुल यांनी याविषयीची माहिती मागवली होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांचा बायोडेटा तसेच त्यांचे प्रसिद्ध झालेले संशोधन प्रबंध, त्यांच्या नावावर असलेले पेटंट्स आदींची माहिती बागुल यांनी मागितली होती. 


त्यावर ही माहिती विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. खरंतर विद्यापीठाच्या वेबसाईटवर विद्यापीठानं स्वतःहून ही माहिती प्रसिद्ध करणं अपेक्षित आहे. मात्र तसेही झालेलं नाही. कुलगुरूंबाबतची माहिती उपलब्ध नसल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.