उल्हासनगर  : महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उल्हासनगरमधील हॉटेल व्यावसायिक बिलात सवलत देऊन जनजागृती करणार आहेत. बोटावर शाई दाखवा आणि सवलत मिळवा अशी योजना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर हॉटेल वेलफेअर असोसिएशनने आपल्या सदस्यांना पत्र लिहून मतदान करून येणा-या ग्राहकांना सवलत देण्याचे आवाहन केलंय. या असोसिएशनमध्ये ७० हॉटेल असून मतदान केल्यास २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. 


२१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत ही सवलत असणार आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या मतदार जनजागृती मोहिमेला हॉटेल असोसिएशनने प्रतिसाद दिला आहे.