शिर्डी : रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने आगरा येथील अजय गुप्ता आणि संध्या गुप्ता या साई भक्त परिवाराने शिर्डीच्या साईबाबाना तब्बल 35 लाख रुपये किमतीचं चांदीची मखर भेट स्वरुपात दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे मखर 67 किलो चांदी तसेच 142 किलो सागाच्या लाकड़ापासून बनवण्यात आली असून हे मखर आज साईबाबांच्या व्दारकामाई मध्ये बसवण्यात आलीय. या चांदीच्या मखरवर, प्रभु रामचंद्र सीता लक्ष्मण यांची प्रतिमा असून या मखर मध्ये साईबाबांची प्रतिमा ठेवण्यात आलीय.


शिर्डीतील विजय बँकच्या वतीने आज शिर्डी साईबाबाना पैसे मोजण्याचे मशीन भेट स्वरुपात देण्यात आलंय. या 8 लाख रुपये किमतीचे हे मशीन संस्थानमध्ये कॅश काउंटिंगमध्ये पैसे मोजण्यासाठी वापरण्यात येणार आहे.