पुणे : वर्षभर संगीत रसिक ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात, अशा सवाई स्वरयज्ञाला आज सुरूवात झाली. या महोत्सवाचं हे 64 वं वर्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे शिष्य एस बल्लेश आणि त्यांचे पुत्र कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनाने यंदाच्या महोत्सवाला सुरूवात झाली. 


राग मारूबिहागने त्यांनी आपल्या वादनाला सुरूवात केली. तर जोग रागामध्ये त्यांनी रंगवलेल्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी दाद दिली. 


वादनाच्या शेवटी याद पिया की आयें ही धून, सादर करत त्यांनी रसिकांची दाद मिळवली. यावेळी सुरेश राज यांनी तबल्यावर साथसंगत केली होती.