भिवंडी : पावर लुम पाहण्यासाठी आणि त्यातील कामगारांची वस्त्रउद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी भेट घेतली. पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीनंतर भिवंडीतील पावर लुम उद्योग डबघाईला आला. त्यामुळे कापड्याचं ७०% पावर लुम बंद झाल्यानं उत्पादन कमी झालं.


भिवंडीतील कामगार हे रोजनदारीवर काम करतात. त्याबदल्यात त्यांना रोख पगार दिला जातो. भिवंडी शहरात लघुउद्योजक मोठ्या प्रमाणात असल्यानं नोटबंदीचा फटका बसला. तयार कपडा विकून त्यातील येणा-या रोख पैशातून कामगारांचा पगार आणि कच्चा माल आणण्यासाठी उपयोग होत होता. मात्र,माल विकून रोख रक्कम  न मिळाल्यानं कामगारांचे पगार वेळेवर होत नसल्यानं कामगार गावाकडे निघून जात आहेत.