ठाणे : महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीला ऊत आलाय. ठाण्यात तर शिवसेनेत प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांना तकिटं देण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यातले शिवसेनेचे स्थानिक नेते देवराम भोईर यांच्या घरात चार जणांना उमेदवारी देण्यात आलीय. तर एच.एस. पाटलांच्या घरात तिघांना तिकिटं मिळालीयंत. 


यात शिवसेनेचे आमदार खासदारही मागे राहिलेले नाहीत. त्यांच्याही पत्नी, मुलगा, सून आणि भावांना उमेदवारीची खिरापत वाटण्यात आलीय. 


या नेत्यांच्या नातेवाईकांना शिवसेनेने दिली उमेदवारी 


सरनाईक फॅमिली
१) परीषा सरनाईक ( पत्नी)
२) पुर्वेश सरनाईक (मुलगा)


राजन विचारे फॅमिली
१) नंदिनी विचारे ( पत्नी )
२) मंदार विचारे ( पुतण्या)


एच एस पाटिल फॅमिली
१) एच एस पाटिल ( स्वत:)
२) कल्पना पाटिल ( पत्नी)
३)स्नेहा पाटिल ( सून )


एकनाथ शिंदे फॅमिली
१) प्रकाश शिंदे ( भाऊ)


सुभाष भोइर फॅमिली 
१) सुमित भोइर ( मुलगा)


देवराम भोइर फॅमिली
१) देवराम भोइर ( स्वत:)
२) संजय भोइर ( मुलगा )
३) उषा भोइर ( सुन)
४) भूषण भोइर ( मुलगा)


रविंद्र फाटक फॅमिली 
१) जयश्री फाटक ( पत्नी )
२) नम्रता फाटक ( वहिनी )


अनंत तरे फॅमिली
१) संजय तरे ( मुलगा )
२) महेश्वरी तरे ( सून )