रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकीत सोनिया गांधींची एन्ट्री! सोनिया गांधी यांना भाजपचे तिकीट. आम्ही एप्रिल फुल करत नाही. आम्ही सांगतोय ते शंभर टक्के खर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सोनिया गांधी भाजपमध्ये कशा? त्या झेडपीच्या रणसंग्रामात काय करतायत? तुम्ही ही बातमी वाचली तर तुमचा विश्वास बसेल.


सोनिया गांधींचं कोडे सोडवण्यासाठी आम्ही थेट जाऊन पोहोचलो रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या भांबेडमध्ये. तिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवाराचं नाव आहे, सोनिया शंकर गांधी. नावात साम्य असल्याने त्यांना पाहण्यासाठी गावागावात एकच झुंबड उडत आहे.


सोनिया गांधी यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही आपले नशीब आजमावलं होते. त्यावेळी अवघ्या 20 मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा झेडपीच्या रणसंग्रामात त्या रिंगणात आहेत. 


काँग्रेसच्या सोनिया गांधी जगप्रसिद्ध आहेत. नामसाधर्म्याचा फायदा भाजपच्या सोनियांना कितपत होतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.