औरंगबाद : पोलिसांनी एसटी महामंडळाची एक शिवनेरी गाडी  ताब्यात घेतली आहे. अपघातानंतर सगळ्याच गाड्या जप्त करतात. त्यात नवीन असं काही नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बसने पोलिसांच्या गाडीला धड़क दिली होती. त्यात पोलीस व्हॅनचं मोठं नुकसान झाले. त्यामुळे जोपर्यंत पोलीस व्हॅन रिपेअर होत नाही, तोपर्यंत बस सोडणार नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला.  हतबल एसटी कर्मचारी तातडीने पोलीस व्हॅन आपल्या कार्यशाळेत घेऊन गेले आहेत.  आणि व्हॅनची दुरूस्ती सुरु केली.  


ही शिवनेरी बस औरंगाबाद-पुणे या रस्त्यावर चलते. ही बस पोलीस स्टेशनला उभी असल्याने रोजचे 35 हजराचे नुकसान महामंडलला सोसावे लगत आहे. पण काय करणार, पोलीस दादागिरीसमोर बिचारं महामंडळांचा नाईलाज झाला.