हरवलेल्या, जळलेल्या जंगलाची गोष्ट!
जंगल म्हटलं कि किर्रर्र झाडी, उंचच उंच वृक्ष आणि मोठमोठे हिरवे दिसणारे डोंगर. मात्र आता हे चित्र बदलत आहे. हिरवे दिसणारे डोंगर काळे आणि ओसाड दिसत आहे
भोर : जंगल म्हटलं कि किर्रर्र झाडी, उंचच उंच वृक्ष आणि मोठमोठे हिरवे दिसणारे डोंगर. मात्र आता हे चित्र बदलत आहे. हिरवे दिसणारे डोंगर काळे आणि ओसाड दिसत आहे
आजही वृक्षांची तोड, जाणुन बुजून लावलेल्या वणव्यामुळे जंगल ही गोष्ट फक्त गोष्टीतच राहतोय का असे वाटू लागलंय. या सगळ्या बाबींवर आळा घालण्यासाठी आणि कडक नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारचे वनविभाग हे २४ तास कार्यरत असते. पण वनविभागाच्या कार्यक्षमतेवर जनता मात्र नाराज आहे.
मात्र वास्तविकता पाहीली गेली तर वनविभागाला अपुरे मनुष्यबळ आणि काहीच नसलेली यंत्रसामुग्री असं वास्तव समोर आले. आज ही वणवा विझविण्यासाठी वनविभागाला पारंपरिक पध्द्तीने वणवा विझवावा लागत आहे. पायाला हाताला चटके खात डयुटी बजवावी लागते हे ऐकल्यावरही चटका बसतो.
आज जंगलाला लागणा-या आगीबद्दल बोलताना हे सगळं थांबवायच असेल तर
वनविभागाला, वनकर्मचा-यांना दोष देण्यापेक्षा आज गरज आहे ती जंगल ही आपली सगळ्यांची आहेत हा वणवा प्रत्येकापर्यंत पेटवत नेण्याची.