कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आलीय. रंकाळा तलावाच्या शेजारील खणीत या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाती सणगर आणि विकास राऊस असं आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. या  घटनेची नोंद कोल्हापुरातील राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 


या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर दोघांचेही हात दोरीने बांधले होते. त्यामुळे आत्महत्या की हत्या याबाबात पोलीस कसून तपास करतायत.