ठाणे : गुंतवणूकदारांना जवळपास चार हजार कोटींच गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटचा संचालक सुहास समुद्र अखेर पोलिसांना शरण आलाय. ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुहास आणि त्याची पत्नी सुनिता शरण आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या संपत्तीवर टाच आणण्याची तयारीही सुरू केलीय. समुद्र कुटुंबियांची बँक खाती गोठवण्यात येणार आहेत.


२८ वर्षांपासून बदलापूरात गुंतवणूकीचा व्यवसाय करणाऱ्या समुद्र यांनी सागर इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून विविध गुंतवणूकीच्या योजना देऊन अनेक गुंतवणूकदाराना कोट्यावधी रुपयांना फसवलं. 


महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे रक्षण अधिनियमानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पाच जणांच्या नावे किती संपत्ती आहे तसंच बँक खाती कुठे आणि त्यात रकमा किती? याची तपासणी सुरु आहे.